जम्मू : भाजपचे खासदार उदित राज यांनी वाढत्या असहिष्णुतेवरून सरकारविरोधात आवाज उठविला आहे. देशातील या वाढत्या असहिष्णुतेला आळा घातला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.मोदी सरकारच्या कार्यकाळात असहिष्णुता वाढली आहे, अशी कबुली उदित राज यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देखील असहिष्णुतेच्या विरोधात बोलले आहेत, असे ते म्हणाले. आरक्षण धोरणाचा फेरविचार केला पाहिजे, या भागवत यांच्या विधानावर बोलताना राज म्हणाले, कुणीही आरक्षण समाप्त करू शकत नाही, अशी ग्वाही संघ व नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे.
असहिष्णुतेला आळा घाला -उदित राज
By admin | Published: November 01, 2015 11:45 PM