शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

सुभाष चंद्रांविरुद्ध दिवाळखोरी कारवाई करा; इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या याचिकेवर ‘एनसीएलटी’चे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 9:27 AM

चंद्रासोबतचा समझोता पूर्ण न झाल्याने या वर्षाच्या सुरुवातीला आयएचएफएलने हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.

नवी दिल्ली : इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सने दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) सोमवारी माध्यमसम्राट सुभाष चंद्रा यांच्याविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई करण्याचे आदेश दिले.

एनसीएलटीच्या दोनसदस्यीय दिल्ली खंडपीठाने झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे (झेडईईएल) मानद अध्यक्ष चंद्रा यांच्याविरुद्ध वैयक्तिक दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. ते एस्सेल ग्रुप फर्म विवेक इन्फ्राकॉन लिमिटेडला दिलेल्या कर्जासाठी हमीदार होते. अशोक के. भारद्वाज आणि सुब्रत के. दास यांचा समावेश असलेल्या एनसीएलटी खंडपीठाने इतर दोन कर्जदार आयडीबीआय विश्वस्त आणि ॲक्सिस बँकेने दाखल केलेल्या समान याचिका फेटाळल्या.

२०२२ मध्ये विवेक इन्फ्राकॉनने सुमारे १७० कोटी रुपये थकवल्यानंतर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (आयएचएफएल) एनसीएलटीकडे धाव घेतली होती. विवेक इन्फ्राकॉन हा एस्सेल ग्रुपचा एक भाग आहे ज्याचे प्रवर्तक चंद्रा आहेत.

चंद्रा यांचा युक्तिवाद फेटाळलायापूर्वी चंद्रा यांनी युक्तिवाद केला होता की, दिवाळखोरीच्या कार्यवाहीसाठी वैयक्तिक हमीदार जबाबदार असू शकत नाही आणि एनसीएलटीला त्याच्याविरुद्ध प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार नाही. तथापि हा युक्तिवाद एनसीएलटीने मे २०२२ मध्ये नाकारत वैयक्तिक दिवाळखोरीच्या कार्यवाहीचा निर्णय घेण्याचा अधिकार लवादाला आहे, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर चंद्रा यांनी अपिलीय न्यायाधिकरणासमोर (एनसीएलएटीए) याला आव्हान दिले होते. मात्र, पक्षांनी सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्याचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण मागे घेण्यात आले. तथापि, चंद्रासोबतचा समझोता पूर्ण न झाल्याने या वर्षाच्या सुरुवातीला आयएचएफएलने हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.

आता नेमके काय होणार?दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केल्यानंतर चंद्रा हे आयबीसीच्या तरतुदींखाली येतील आणि त्यांना कोणतीही मालमत्ता किंवा संपत्ती विकण्याची, विल्हेवाट लावण्याची किंवा बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. दिवाळखोरी न्यायाधिकरणाद्वारे एक व्यावसायिक नियुक्त केला जाईल, जो सर्व कर्जे एकत्रित करील आणि कर्जदारांना त्यांचे पैसे वसूल करण्यास मदत करील.

कायद्यात सुधारणेमुळे दिवाळखोरीची कारवाईसन २०१९ मध्ये, सरकारने आयबीसीच्या तरतुदींमध्ये सुधारणा केली, ज्यामुळे कर्जदारांना वैयक्तिक हमीदारांविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई करण्याची परवानगी मिळाली. या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले; परंतु नोव्हेंबर २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदींची वैधता कायम ठेवली.

खटल्यासाठी हे कारण ठरले पुरेसेकाही करार, बोलणी झाली असली तरी आयएचएफएलला कोणतीही थकबाकी अदा करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी एनसीएलटीमध्ये दाखल करण्यात आलेले प्रकरण म्हणजे दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहितेच्या (आयबीसी) कलम ९५ अंतर्गत चंद्रांविरुद्ध वैयक्तिक दिवाळखोरीचा खटला सुरू करण्यास पुरेसे ठरले.