भूकंपाच्या पार्श्वभूमीवर बोटा परिसरात जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
By admin | Published: January 23, 2017 8:13 PM
बोटा : भूकंपाचे धक्के बसलेल्या बोटा व परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. भूकंपविषयक मार्गदर्शन कार्यशाळा या गावांमध्ये तातडीने घेण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
बोटा : भूकंपाचे धक्के बसलेल्या बोटा व परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. भूकंपविषयक मार्गदर्शन कार्यशाळा या गावांमध्ये तातडीने घेण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.गेल्या तीन महिन्यांपासून बोटा, माळवाडी व लगतच्या गावांमध्ये भूगर्भातून कमी-अधिक प्रमाणात आवाज व धक्के बसले आहेत. भूवैज्ञानिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. पालकमंत्री राम शिंदे यांनीही शुक्रवारी या परिसरात भेट देऊन पाहणी करत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर आता रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कुरकुटवाडी, बोटा, माळवाडी परिसराला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार रावसाहेब सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, मंडळाधिकारी जी. के. कडलक, सरपंच विकास शेळके, संतोष शेळके, बबन गागरे, उत्तम कुर्हाडे, बाळासाहेब मुसळे उपस्थित होते.ग्रामस्थांनी या धक्क्यांबाबतच्या व्यथा जिल्हाधिकार्यांना सांगितल्या. भूकंपापूर्वी व नंतर घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा या गावांमध्ये तातडीने घेऊ, तसेच या गावांमध्ये प्रथमोपचार साहित्य त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कवडे यांनी ग्रामस्थांना सांगितले. (वार्ताहर)--------पुन्हा बसले हादरे दहा दिवसानंतर पुन्हा रविवारी पहाटे व दुपारी ठरावीक वेळेच्या अंतराने भूगर्भातून कमी-अधिक प्रमाणात आवाज व धक्के बसल्याचे सरपंच विकास शेळके, उत्तम कुर्हाडे व बाळासाहेब मुसळे यांनी सांगितले.