शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

Dr. APJ Abdul Kalam Quotes: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 12:56 PM

Dr. APJ Abdul Kalam Quotes: भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते.

भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांच्या कामाची आगळी शैली आणि विचार करण्याची वेगळी पद्धत यांमुळे त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम असे आहे. 27 जुलै 2015मध्ये शिलाँग मधील आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम स्टेजवर कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे काही प्रेरणादायी विचार. जे तुमच्यातील नकारात्म विचारांना बाहेर काढून तुमच्यातील सकारात्मक विचारांना प्रेरणा देतील...

1. पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. पण गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वरती जावून उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टीकोन वेगळा असतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

2. काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उज्वल करतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

3. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

4. आयुष्यात येणाऱ्या कठिण परिस्थिती ह्या तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठिण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कणखर आहात. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

5. यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

6. आपल्या यशाची व्याख्या भक्कम असेल तर आपण नेहमीच अपयशाच्या दोन पावलं पुढे असू. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

7. झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

8. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

9. आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. संपूर्ण ब्रम्हांड तुमचा मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

10. तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधीही अपयशी होणार नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

11. तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

12. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

टॅग्स :APJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलाम