जयपूर स्टेशनवरील मंजूची कहाणी; पतीच्या मृत्यूनंतर बनली कुटुंबाची ‘कर्ती’ महिला, एश्वर्यासोबत झाला होता सन्मान ही आहे मंजू देवी. जयपूर स्टेशनवर दिसणारी लाल कुर्ती आणि काळ्या सलवारमध्ये असलेली आणि दंडाला १५ नंबरचा बिल्ला लावणारी उत्तर-पश्चिम रेल्वेवरील पहिली महिला कुली.पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर कोसळलेले आर्थिक संकट दूर सारण्यासाठी मंजू देवीने कूलीची ‘लाल’ कुर्ती अवलंबली आणि त्यातून तीन मुलांच्या गुजराण करण्याचा तिला मार्ग सापडला.ती एका प्रवाशाचे तब्बल ३० किलो सामान एकाच वेळी उचलते, पण तीन मुलांची गुजराण करण्यासाठी हे ३० किलोंचं ओझं काहीच वाटत नाही, असं ती सांगते. तिच्या या अनोख्या कामाचा केंद्रीय महिला व बाल कल्याण खात्याने अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या साथीनं सन्मानही केला आहे.
प्रेरणादायी : तीन मुलांसाठी ‘ती’ बनली कुली, एकाच वेळी उचलते ३० किलोच्या बॅगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:45 AM