नियंत्रण कक्षाची स्थापना
By admin | Published: March 29, 2016 12:24 AM
जळगाव : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियंत्रण कक्ष, टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा दूरध्वनी क्रमांक २२१७१९३ व २२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियंत्रण कक्ष, टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा दूरध्वनी क्रमांक २२१७१९३ व २२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सीसीटीव्हीसाठी प्रस्ताव मागविलाजळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयातून बाळ चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेचे बाळ चोरीला गेले आहे. तर काही दिवसांपूर्वी एका महिलेेने जळीत कक्षातून बाळाला चोरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सोमवारीदेखील बाळाच्या चोरीचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना जिल्हा रुग्णालय व परिसरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशी सूचना केली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये सीसीटीव्हीसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.