समजा तुमच्या घरात तुमचं लहान बाळ आहे. त्या बाळाच्या बाललीला दररोज तुम्ही बघत आहात.एके दिवशी तुमचं बाळ पहिल्यांदा उभ राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा क्षण तुम्ही तुमच्या मोबाईल कॅमेरा मध्ये रेकॉर्ड केला .हा आनंद तुम्हाला तुमच्या जोडीदारा सोबत शेअर करायचा आहे . त्यावेळी तुम्ही काय कराल ? एकतर तुमच्या जोडीदाराला व्हिडिओ कॉल करून हे आनंददायी क्षण लाईव्ह दाखवाल किंवा तुमचा जोडीदार घरी आल्यावर त्याला हे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवाल . मात्र आता आणखी एक सोपा पर्याय फेसबुक मेसेंजर ने तुम्हाला उपलब्ध करून दिला तो म्हणजे इन्स्टंट व्हिडिओ. यामध्ये फेसबुक मेसेंजर वर चॅट करत असताना असे छोटे छोटे क्षण रेकॉर्ड करून त्याचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. म्हणजे यापुढे असा एखादा क्षण जो तुम्हाला इतरांसोबत शेअर करावा असे वाटते तो फेसबुक मेसेंजरच्या इन्स्टंट व्हिडिओ या फिचर चा वापर करून आपल्या परिजनांना पाठविता येऊ शकतो.
इन्स्टंट व्हिडिओ कसे पाठवाल ?इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर वापरायचे असेल तर ज्याला इन्स्टंट व्हिडिओ पाठवायचा आहे त्याच्या स्मार्टफोनवर सुद्धा लेटेस्ट फेसबुक मेसेंजर ओपन असले पाहिजे तरच इन्स्टंट व्हिडिओ तुम्ही समोरच्याला पाठवू शकाल . इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर व्हिडिओ कॉलिंग पेक्षा पूर्णतः वेगळे आहे.व्हिडिओ कॉलिंगचे फिचर २०१५ पासूनच फेसबुक मेसेंजर मध्ये उपलब्ध आहे.काही वेळा आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविन्यासाठी शब्द अपुरे पडतात अशा वेळी इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर कामी येईल.