नवी दिल्ली : मुंबई येथील व्यावसायिकाविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, त्याची फसवणूक केल्याच्या तक्रारीची शहानिशा करून, त्यात तथ्य असल्यास कोटक महिंद्र बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक व अन्य अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाने अर्थ मंत्रालयाला केली असल्याचे समजते.
या महिन्याच्या प्रारंभी डॉ. संतोषकुमार बागला यांनी उदय कोटक व बॅँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाच्या सचिवांना या सूचना दिल्या आहेत. बागला यांनी राष्टÑपती कार्यालयाकडे कोटक यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी गृह मंत्रालयाकडे बारखंबा रोड पोलीस स्टेशनमधील तत्कालीन सहा पोलिसांच्या विरोधातही तक्रार केली आहे. या पोलिसांनी कोटक महिंद्र बँकेच्या अधिकाºयांच्या साथीने गैरमार्गाने आपल्यावर कारवाई केल्याची त्यांची तक्रार आहे.मुलाचा विवाह मोडलाडॉ. बागल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या प्रकरणात दिल्लीच्या सहा पोलीस अधिकाºयांनी दुष्ट हेतूने आपला मुलगा भूपेंद्र यांना अटक केली. या चुकीच्या अटकेने भूपेंद्र यांचे लग्न मोडले, त्यांची मानहानी झाली, तसेच व्यवसायामध्ये नुकसान सोसावे लागले. यावर पंतप्रधान कार्यालयाने वरील निर्देश अर्थमंत्रालयाला दिले आहेत.