लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत सर्व राज्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा व उपकरणे सुस्थितीत ठेवण्यास प्राधान्य देण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय आराेग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या प्रतिनिधींसाेबत उच्चस्तरीय बैठक झाली, त्यात त्यांनी काेराेना स्थितीचा आढावा घेतला.
राज्यांना सूचना देताना भूषण यांनी सांगितले की, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स इत्यादी उपकरणे सज्ज ठेवावीत. आवश्यक तिथे माॅक ड्रील करून तपासणी करून घ्यावी. रुग्णांना बेडपर्यंत सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा हाेत आहे का, याची सर्वप्रथम खातरजमा करून आवश्यक ती दुरुस्ती तत्काळ करून घ्यावी, असे भूषण यांनी सांगितले.
क्षमता काय?n देशात सध्या १९ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याची क्षमता आहे. काेराेनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ३ हजार, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९ हजार मेट्रिक टनाहून अधिक मागणी निर्माण झाली हाेती.n देशभरात ओमायक्राॅनच्या ३००७ रुग्णांची नाेंद झाली. त्यात महाराष्ट्रात ८७६, दिल्लीत ४६५, कर्नाटकमध्ये ३३३, राजस्थानमध्ये २९१ आणि केरळमध्ये २८४ रुग्ण आढळले आहेत. पहिल्या लाटेत १ लाख रुग्णसंख्या गाठण्यास ११९ दिवस लागले. दुसऱ्या लाटेत ४५ आणि तिसऱ्या लाटेत ११ दिवसांमध्येच १ लाख रुग्णसंख्या ओलांडली.