नवी दिल्ली : अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी अल्पभूधारक शेतकºयांची ओळख निश्चित करा, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितले आहे. ही योजना १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत या योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. निति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी शनिवारी याची माहिती दिली.सरकारने चालू आर्थिक वर्षात १२ कोटी शेतकºयांच्या मदतीसाठी या योजनेंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी बजेट भाषणात या योजनेची घोषणा केली. यानुसार, दोन हेक्टर म्हणजेच पाच एकरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.राजीव कुमार यांनी सांगितले की, पूर्वोत्तर वगळता अन्य राज्यांत ही योजना लागू करण्यात विशेष अडचणी येणार नाहीत. कृषी सचिवांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि कृषी विभागाचे प्रधान सचिवांना १ फेब्रुवारी रोजी पत्र लिहिले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना गावातील अल्पभूधारक शेतकºयांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. यात शेतकºयाचे नाव, लिंग आणि ते एससी, एसटी श्रेणीचे आहेत काय? याबाबत माहिती द्यायची आहे. ही यादी ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. जेणेकरून चालू आर्थिक वर्षात लवकरात लवकर रक्कम वितरित करता येईल.ही रक्कम कमी नाहीवार्षिक ६ हजार रुपये म्हणजे महिना ५०० रुपयांची मदत शेतकºयांसाठी पर्याप्त आहे काय? असे विचारले असता ते म्हणाले की, ५०० रुपये शेतकºयांसाठी छोटी रक्कम नाही. जर आपण शेतकºयांच्या घरी जाल तर लक्षात येईल की, या पैशांचा उपयोग गरजांसाठी होऊ शकतो. मुलांना शाळेत पाठविणे, सिंचनासाठी पाणी खरेदी केले जाऊ शकते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश, पहिला हप्ता मार्चअखेर मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 7:00 AM