नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे २९ रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी राज्यांना स्पष्ट केले आहे की, त्यांनी जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करावी. देशात आतापर्यंत कोरोनाचे २९ रुग्ण आढळून आले आहेत. यात १६ इटलीचे पर्यटक आहेत. यात केरळचे तीन जण आहेत. मागील महिन्यात त्यांना संसर्ग झाल्याचे लक्षात आले होते. उपचारानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. मंत्रालयाने सांगितले की, ४ मार्चपासून सर्व विदेशींची तपासणी अनिवार्य आहे. बुधवारी रात्रीपासून बहुतांश विमानतळांवर तपासणी सुरु झाली आहे. एकूण ३५४२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात २९ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ९२ नमुन्यांची तपासणी होत असून २३ नमुन्यांची पुन्हा तपासणी होत आहे.>इटलीच्या ९ पर्यटकांना दिल्लीला पाठविलेइटलीचे ९ पर्यटक आणि त्यांचे भारतीय गाईड यांना मध्यप्रदेशात वेगळे ठेवण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर त्यांना बुधवारी रात्री बसने नवी दिल्लीला पाठविण्यात आले आहे.या पर्यटकांनी अशी विनंती केली आहे की, आम्ही आमच्या जोखिमेवर आमच्या देशात परत जाऊ इच्छितो. या सर्वांना छतरपूर जिल्ह्यात नौगावस्थित एका हॉस्पिटलमध्ये वेगळा वॉर्ड करुन ठेवण्यात आले होते.
‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ स्थापन करण्याचे राज्यांना निर्देश, बहुतांश विमानतळांवर तपासणी झाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:45 AM