चिकोडी : काँग्रेसकर्नाटकच्या जनतेला एवढी आश्वासने देत असून यामुळे राज्याचे बजेट पुरणार नाही. राज्य आर्थिक संकटात येणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना पगार कसा देणार, राज्य कसे चालवणार. तसेच बजरंगबलीचा काँग्रेसला काय प्रॉब्लेम आहे. अनेक दशके रामाला बंदिस्त ठेवले होते. आता त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी राममंदिर उभे करीत आहेत. २०२४ ला राममंदिर पूर्ण होणार आहे.
पण येथे काँग्रेस हनुमानाच्या जन्मभूमीतच हनुमानाचा अपमान करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. चिकोडी शहरातील आर. डी. महाविद्यालयावर पार पडलेल्या भाजपचे उमेदवार रमेश कत्ती यांच्या प्रचार सभेत शाह बोलत होते.अमित शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ४८ लाख कुटुंबांना मोफत शौचालय निर्मिती, ४१ लाख कुटुंबांना घरे, ४३ लाख लोकांना नळाने पाणी पुरवठा योजना व ८० कोटी जनतेला मोफत धान्य वाटप केले आहे. कोविड लस देऊन १४० कोटी लोकांचे कोविडपासून रक्षण केले आहे. सरकार झाल्यास राज्यात दीपावली, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी या सणांना प्रत्येकी १ प्रमाणे वर्षाला तीन गॅस सिलिंडर दिले जाणार आहे. उत्तर कर्नाटकात पाण्याची समस्या होती. काँग्रेसला म्हादई वाद सोडवता आला नाही. पण गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रात भाजप सरकार आल्यानंतर म्हादई योजना राबवून पाणी समस्या सोडविली.उमेदवार रमेश कत्ती म्हणाले, चिकोडीत पाणी योजना राबविण्यासह, रोजगार निर्मितीसाठी मला निवडून द्या. डबघाईला आलेल्या जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर बँकेला ऊर्जितावस्था आणली. मतदारसंघाजवळून नदी वाहत असताना सिंचनाचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी जनतेने संधी द्यावी.सभेला खासदार आण्णासाहेब ज्वोल्ले, महांतेश कवटगीमठ, बिहारचे संजीव चौरसिया, चंद्रकांत कोटीवाले, मलिकार्जुन कोरे, भरतेश बनवणे, धुंडापा भेंडवाडे, शांभवी अश्वथपूर, सतीश आप्पाजीगोळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
पीएफआयवर भाजपाकडून बंदीपीएफआय ही संघटना देशविरोधी कार्य करीत असून या संघटनेवर बंदी आणण्याची हिंमत काँग्रेसमध्ये नव्हती. भाजप सरकारने पीएफआयवर बंदी घालून १९१ लोकांना तुरुंगात पाठवले आहे.