अग्निवीरांच्या कुटुंबीयांचा अवमान; लाभ मिळत नसल्याची राहुल यांची टीका, लष्कराकडून इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 05:34 AM2023-10-24T05:34:37+5:302023-10-24T05:36:43+5:30
सोशल मीडियावर अनेक चुकीचे संदेश टाकले जात आहेत. शहीद सैनिकाच्या कुटुंबीयांना नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. वीरमरण आलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना ना पेन्शन मिळते, ना अन्य कोणताही लाभ, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी करत अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवतेचा फोटोही शेअर केला.
लष्कराने म्हटले की, सोशल मीडियावर अनेक चुकीचे संदेश टाकले जात आहेत. शहीद सैनिकाच्या कुटुंबीयांना नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जाते.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सियाचीन येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले ते महाराष्ट्रातील पहिलेच अग्निवीर होत.
कुटुंबीयांना मिळणारी मदत
- विम्याची रक्कम : ४८ लाख रुपये
- अग्निवीरद्वारे जमा केलेला सेवा निधी (पगाराच्या ३० टक्के) यात सरकार समान (व्याजासह) योगदान देईल.
- सानुग्रह अनुदान रक्कम : ४४ लाख
- मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे सेवा होईपर्यंत पूर्ण वेतन
- सशस्त्र सेना बॅटल कॅज्युअल्टी फंडातून : ८ लाख
- आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनकडून तत्काळ मदत : ३० हजार रुपये