धक्कादायक! अपमानजनक व्हॉट्स अॅप पोस्ट अन् तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:43 IST2025-04-04T19:39:32+5:302025-04-04T19:43:39+5:30
एका तरुणाने आपल्याच ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! अपमानजनक व्हॉट्स अॅप पोस्ट अन् तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप
व्हॉट्स अॅप ग्रुपवरील एक अपमानजनक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला, पोस्ट करणाऱ्यासह त्या ग्रुपच्या अॅडमीनलाही तिसरा आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली. या अटकेमुळे ३५ वर्षीय तरुणाने त्याच्या ऑफिसमध्येच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येवेळी त्या करुणाने सुसाईड नोट लिहूने ठेवली होती. या नोटमध्ये त्या तरुणाने काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण बंगळुरू येथील आहे, मृत तरुणाचे नाव विनय सोमय्या असे आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तो तरुण भाजपाचा पदाधिकारी होता. आपल्या सुसाइड नोटमध्ये त्याने आत्महत्येसाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांना जबाबदार धरले आहे. शुक्रवारी बंगळुरूच्या नागवारा भागात विनय सोमय्याने टोकाचे पाऊल उचलले.
वक्फ विधेयकाविरुद्ध असदुद्दीन ओवैसी सर्वोच्च न्यायालयात; काँग्रेस खासदारानेही याचिका दाखल केली
सुसाईट नोटमध्ये काय आहे?
सुसाईड नोटनुसार, एका स्थानिक काँग्रेस नेत्याने त्याच्याविरोधात राजकीय कट रचला होता, यातूनच त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख नाटोमध्ये करण्यात आला आहे.
सुसाईड नोटमध्ये काँग्रेस कार्यकर्ता तेनिरा महेना, आमदार एएस पोन्नण्णा आणि इतरांनी खोट्या प्रकरणात अडकवून छळाचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमय्या हा "कोडागीना समसयेगलु" नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन होता, त्याच ग्रुपवर काँग्रेस आमदार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे कायदेशीर सल्लागार एएस पोन्नन्ना यांच्याविरुद्ध एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये पारंपारिक कोडावा पोशाखात शौचालयासह पोन्नन्नाचा एक एडिटेड फोटो होता. त्यावर काही अपशब्द लिहिलेले होते.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आत्महत्येचे खरे कारण शोधण्याचा शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
अपमानास्पद पोस्ट व्हायरल झाली त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्ती आणि व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनविरुद्ध एफआयआर दाखल केली. यामध्ये विनय सोमय्या यांनाही आरोपी क्रमांक ३ बनवण्यात आले. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. त्याला नंतर जामिनावर सोडण्यात आले. नंतर न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती दिली. असे असूनही, पोलीस आणि राजकारणी त्याला त्रास देत होते, असा आरोप त्याने केला आहे.