नवी दिल्ली : दिवाळीपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे.'पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. पीएम मोदींवर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. पीएम मोदींवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी रॅली किंवा रोड शोमध्येही एन्ट्री घेऊ शकतात, असंही यात म्हटले आहे.
रामनवमीला झालेल्या दंगलीत सहभाग; 12 वर्षीय मुलाला ठोठावला 2.9 लाखांचा दंड
गुप्तचर कागदपत्रांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या गणवेशातही दहशतवादी पीएम मोदींच्या कार्यक्रमस्थळी आत्मघाती हल्ला करू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांचा पुढील आठवड्यात गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश दौरा आहे.या पार्श्वभूमिवर हा अलर्ट जारी केला आहे.
भारतीय सुरक्षा दलांना आयएसआयच्या दहशतवादी मनसुब्यांची माहिती मिळाली आहे.