श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील काही भागामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी दहशतवाद्यांकडून षडयंत्र रचलं जात असल्याची माहिती हाती लागली आहे. सरकारी सूत्रांनुसार काश्मीरमधील श्रीनगर आणि अवंतीपुरा या एअरबेसवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता दिली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केलेला आहे.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र रचत आहे. हवाई दलाच्या श्रीनगर आणि अवंतीपुरा बेसकॅप्म दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहेत.
अनेक दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकी होत आहेत. त्यामुळे फक्त सीमेच्या पलीकडे नाही तर घाटीमध्येही काही दहशतवादी लपून बसल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये भीषण चकमक झाली. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले मात्र या चकमकीत एक जवान शहीददेखील झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद संपविण्यासाठी भारतीय जवानांकडून ऑपरेशन ऑलआउट सुरु करण्यात आलं आहे. या ऑपरेशनमुळे या वर्षीच्या सुरुवातीपासून अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
बुरहान वानीचा चकमकीत खात्मा सुरक्षा रक्षकांनी 8 जुलै 2016 मध्ये चकमकीत बुरहान वानी याचा खात्मा केला होता. बुरहानचा खात्मा केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण होते. तेव्हापासून आतापर्यंतच्या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. हिज्बुल या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वॉन्टेड असलेला बुरहान वानी हा येथील युवकांसाठी सोशल मीडियावर फेमस होता. काही महिन्यांपूर्वी स्थानिक लोकांना विचारले असता त्याला 'भारतीय एजेंट' असल्याचे सांगत. मात्र, सुरक्षा यंत्राणांसाठी बुरहान वाणी हा मीडियाने तयार केलेला कागदी वाघ होता. पुलवामामधील त्राल परिसरात जन्म झालेला बुरहान वानी वयाच्या 15 व्या वर्षी दहशतवादी बनला होता. 22 व्या वर्षी सुरक्षा रक्षकांनी त्याचा खात्मा केला. बुरहान वानीच्या खात्माआधी काश्मीर खोऱ्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा नायनाट होण्यास आला होता. मात्र, गेल्या तीन वर्षात पुन्हा जैश-ए-मोहम्मदने डोके वर काढले आहे. काश्मीर खोऱ्यात शेकडो बुरहान वानी तयार करण्याचा उद्देश जैश-ए-मोहम्मद संघटनेचा आहे.