- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : २0१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा इरादा काँग्रेसने अधिवेशनात व्यक्त केला असून, पाच मोठ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचेही ठरविले आहे. महाराष्टÑ, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार यांचा त्यात समावेश आहे.सलमान खुर्शिद यांनी सांगितले की, ही पाच राज्ये आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, इतर राज्ये महत्त्वाची नाहीत, असा अर्थ कोणी काढू नये. एका नेत्याने सांगितले की, वरील पाच राज्यांत लोकसभेच्या २३९ जागा आहेत. तिथे भाजपची स्थिती आता २0१४ सारखी नाही. त्यामुळे या राज्यांवर लक्ष केंद्रित करीत आहोत.महाराष्टÑात रामदास आठवले यांना भाजपचे मंत्री भेटीसाठी वेळ देत नाहीत. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, रिपाइं, शेतकरी संघटना एकत्र आल्यास भाजपसाठी कठीण स्थिती होईल. रामदास आठवले आणि काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते यांच्यात अलीकडेच एक बैठक झाली आहे.