विद्यार्थ्यांचे दोन गट परस्परात भिडले पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप : मू.जे. महाविद्यालय परिसरात सलग दुसर्या दिवशी वाद
By admin | Published: July 29, 2016 11:38 PM
जळगाव : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मू.जे. महाविद्यालयाच्यापरिसरात घडली. या घटनेची माहिती होताच, रामानंदनगर पोलिसांच्या गस्ती पथकातील पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना पांगवले. महाविद्यालयाच्या परिसरात सलग दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना घडल्याने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जळगाव : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मू.जे. महाविद्यालयाच्यापरिसरात घडली. या घटनेची माहिती होताच, रामानंदनगर पोलिसांच्या गस्ती पथकातील पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना पांगवले. महाविद्यालयाच्या परिसरात सलग दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना घडल्याने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, मू.जे. महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वीच्या काही विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने विद्यार्थ्यांचे दोन गट परस्परात भिडले. वाद सुरू असताना विद्यार्थी आरडाओरड करीत गोंधळ घालत होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराची माहिती होताच, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकातील पोलीस कर्मचारी तेथे पोहचले. त्यांनी हस्तक्षेप करीत विद्यार्थ्यांना तेथून हुसकावून लावले. पोलिसांनी घटनास्थळी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांना समज देऊन सोडण्यात आले.पुन्हा वादगुरुवारीदेखील मू.जे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याने महाविद्यालयासह पोलीस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.सीसीटीव्ही कॅमेर्यांसाठी पत्र देणारमहाविद्यालयाच्या आवारासह बाहेरचा रस्ताही काही प्रमाणात दिसेल; अशा रितीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, म्हणून महाविद्यालयाला विनंती करणारे पत्र पोलिसांकडून देण्यात येणार असल्याची माहिती घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचार्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे वाद घालणार्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करता येईल, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.