ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 25 - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील (ईपीएफ) व्याजदरात कपात करण्यात आली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात पीएफ खाते धारकांना 8.7 टक्के एवढा व्याजदर मिळणार आहे. यापूर्वी पीएफवरील व्याजदर 8.75 टक्के होता. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे देशभरात जवळपास 5 कोटी सभासद आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 2013-14 आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याजदर देण्यात आला होता. तर 2011-12 आणि 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.25 टक्के होता.