नवी दिल्ली - देशात 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. आज त्या आणीबाणीला 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आणीबाणीवर भाष्य करताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. "45 वर्षांपूर्वी सत्तेच्या हव्यासापोटी एका परिवाराने देशात आणीबाणी लागू केली. एका रात्रीत संपूर्ण देशाचा तुरुंग केला. प्रसारमाध्यमं, न्यायव्यवस्था यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला होता. त्यावेळी गरीबांवर अत्याचारही करण्यात आले होते" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
आणीबाणीवरून अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "लाखो लोकांच्या प्रयत्नांनंतर देशातून आणीबाणी हटवण्यात आली होती. देशात पुन्हा स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं होतं. मात्र काँग्रेसचं वागणं बदललं नाही. एका कुटुंबाचं हित, पक्ष आणि देशहिताच्या वर ठेवण्यात आलं. काँग्रेसमध्ये आजही तीच परिस्थिती आहे" असं म्हणत शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
अमित शाह यांनी काँग्रेसच्या नेत्यांची सध्या पक्षात घुसमट होत असल्याचं देखील म्हटलं आहे. "काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही मुद्दे मांडले होते. मात्र ते दाबण्यात आले. काहीही विचार न करता पक्षाने एका प्रवक्त्याची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची सध्या पक्षात घुसमट होत आहे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.तसेच काँग्रेसने स्वत:ला आणीबाणीची मानसिकता आताही का कायम आहे?, एकाच घराण्याच्या लोकांना वगळता अन्य नेत्यांना बोलण्याची परवानगी का नाही? आणि काँग्रेसमध्ये नेते निराश का आहेत? असे प्रश्न विचारण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गाठला नवा उच्चांक
बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान