नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोएल मांडणार आहेत. या अंतरिम अर्थसंकल्पात वैयक्तिक करदात्यांना काही कर सवलती मिळण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे.या अर्थसंकल्पाबाबत प्राप्तिकरात सूट देण्याची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढते काय, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मध्यमवर्ग व शेतकरी वर्गासाठी काही खास घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल मात्र यंदा संसदेत सादर होण्याची शक्यता दिसत नाही.
Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 7:13 AM