नवी दिल्ली - दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या विशेष दिवशी लोकांना योगाबद्दल जागरूक करण्याचे काम केले जाते. यंदा देशात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. योग दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारने योग दिनाला विशेष बनवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी योग दिनी काय खास असणार हे जाणून घेऊया...
75 मंत्री ऐतिहासिक ठिकाणी करणार योगा
आंतरराष्ट्रीय योग दिवस आपल्या देशात खूप खास असणार आहे. मोदी सरकारचे 75 मंत्री देशातील 75 विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांवर योगा करणार आहेत. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील मैसूर पॅलेसमध्ये योगा करणार आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शहा नाशिकमधील पवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात योगा करणार आहेत. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे योग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर दिल्लीतील लोटस टेम्पलमध्ये योगा करतील.
योग दिवस प्रत्येक वर्गासाठी असेल खास
सरकारने यावेळी अपंग, तृतीयपंथी, महिला आणि मुलांसाठी विशेष कार्यक्रम तयार केले आहेत. शाळांमध्ये योगशिक्षणाचा अविभाज्य भाग असलेल्या मानवी मूल्यांकडे लक्ष देण्यात येणार आहे. या वर्षीच्या कार्यक्रमात लाखो ग्रामस्थ सहभागी होतील अशी केंद्राची अपेक्षा आहे कारण कॉमन सर्व्हिस सेंटर्स या प्रथेला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
गार्जियन रिंग कार्यक्रम होणार
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 च्या कार्यक्रमात अनेक गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळतील. 'गार्जियन रिंग' कार्यक्रमाचा समावेश आहे. याशिवाय विविध देशांतील लोकांचा सहभाग असणार असून रिले योगाचे थेट प्रक्षेपणही होणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम
आयुष मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी 'योगा फॉर ह्युमॅनिटी' ही थीम निवडण्यात आली आहे. ज्याचा अर्थ मानवतेसाठी योग. हीच थीम लक्षात घेऊन यावर्षी जगभरात योग दिन साजरा केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 11 डिसेंबर 2014 रोजी दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
योगाचे महत्त्व
योगासने केल्याने शरीर निरोगी राहते. योगाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. रोज योगासने केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार दूर राहतात. वाढता ताणतणाव आणि जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर योगाने मात करता येते. योगा केल्याने शरीर मजबूत होते. योगामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.