International Yoga Day 2023: अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, योग दिनानिमित्त काँग्रेसने ट्विट करत योगा लोकप्रिय केल्याबद्दल आणि राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवल्याबद्दल माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचे आभार मानले आहेत.
मात्र, काही वेळातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी काँग्रेसच्या (Congress) ट्विटला रिट्विट करत योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिल्याबद्दल मोदी सरकारचे (Narendra Modi) कौतुक केले. शशी थरूर म्हणाले की, आपल्याला आपले सरकार (BJP) आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्नही लक्षात ठेवले पाहिजेत.
श्रेय मोदी सरकारलाही जाते - शशी थरूरकाँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले की, "नक्कीच! ज्यांनी योगा लोकप्रिय केला आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचे आपण स्मरण केले पाहिजे. आपले सरकार, PMO आणि परराष्ट्र मंत्रालयानेदेखील संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून योगाचे आंतरराष्ट्रीयीकरण करून आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता मिळवून दिली आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, योग हा जगभरातील आपल्या सॉफ्ट पॉवरचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो ओळखला जात आहे, हे पाहून खूप आनंद झाला.''
मोदी सरकारचे कौतुक शशी थरूर यांनी काँग्रेसला दिलेल्या सल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शशी थरूर यांनी याआधीही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे अनेकवेळा कौतुक केले आहे.