रांची - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची येथील प्रभात तारा मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी 40 हजारपेक्षा अधिक लोक या मैदानात उपस्थित होते. तुमच्या दैनंदिन आयुष्यात योगसाधना अविभाज्य भाग झाला पाहिजे. योग हा सर्वांचा आहे. हवामान बदल हे यंदाच्या योग दिनाचे सूत्र आहे असं प्रतिपादन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलं.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, समाजातील गरिबांपर्यंत योगा पोहचला तर ते आजारापासून वाचू शकतील. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. त्यामुळे आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. योगाचं पालन संपूर्ण जीवनभर केलं पाहिजे. योग कधीही वय, रंग, जात-पात, धर्म-पंत, श्रीमंत-गरीब, प्रांत-देश असा भेदभाव करत नाही. योग सर्वांचा आहे आणि सर्व जण योगाचे आहेत असं मोदी म्हणाले.
तसेच बदलत्या काळानुसार आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी आपल्या शरीरावर आपण लक्ष्य ठेवलं पाहिजे. ही शक्ती आपल्याला योगापासून मिळते. ही भावना योगात आहे. योगामध्ये प्राचीन भारताचं दर्शन होतं.
निरोगी शरीर, मन आणि एकतेची भावना याचा योग्य मिलाफ योगक्रियेत आहे. त्यामुळे योग साधनेने माणूस समृद्ध होतो असं मोदींनी सांगितले.
वेगवेगळ्या आजारांमुळे गरिबांना खूप जास्त जास्त तर होतो. त्यामुळे देशामध्ये एकीकडे गरिबी कमी होत असताना त्यांच्यासाठी योगाचे माध्यम पोहोचायला पाहिजे. यामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून योग पद्धतीत कोणताही फरक पडलेला नाही. यामुळे माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते, असं मोदींनी सांगितले.
कोणत्याही व्यक्तीला निरोगी बनविण्यासाठी योग फार महत्वाचा आहे. आपल्याला योगाच्या अभियानाला वेगळ्या स्तरावर घेऊन जायचे आहे. योग्य आपल्या देशात पहिल्यापासून आहे. आपल्या संस्कृतीचा अभिन्न हिस्सा आहे, असे ते म्हणाले. यामध्ये आसन आणि मुद्रांना व्यक्त केले जाते.