नवी दिल्ली : पुढील २४ तास इंटरनेट सेवा देणारे जगभरातील मुख्य सर्व्हर्स बंद राहणार असल्याने या काळात इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी भारताला याचा फटका बसणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे व प्रसंगी त्यात दुरुस्तीचे तसच ते अपडेट करण्याचे काम इंटरनेट कॉपोर्रेशन आॅफ असाइन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स (आयसीएएनएन) या कंपनीमार्फत केले जाणार आहे. जगभर इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या या सर्व्हर्समध्ये काही अत्यावश्यक तांत्रिक बदल करण्यात येणार असल्याचे रशिया टुडेने म्हटले आहे.कीमध्ये म्हणजेच जगभरातील वेबसाइट्सचे डोमेन नेम्स (विविध वेबसाइट्सची नावे) साठवून ठेवलेली असतात. त्या क्रिटोग्राफिक कीमध्ये या काळात काही बदल करण्यात येतील. जगभरात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने हे बदल करण्यात येणार आहेत, असे आयसीएएनएन या कंपनीने नमूद केले आहे. परंतु, यामुळे भारतात इंटरनेट बंद होणार नाही. यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे देशाच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा विभागाचे समन्वयक गुलशन राय यांनी सांगितले.
इंटरनेट बंद होणार नाही, भारताने केल्या उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 4:07 AM