नवी दिल्ली : महागाई आणि जीएसटीच्या मुद्यावरून संसदेच्या सभागृहात कामकाजात होणारे अडथळे आणि तपास एजन्सींच्या दुरुपयोगाबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पत्राद्वारे केली आहे.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात म्हटले आहे की, पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत कामकाजात अडथळे येत आहेत. कारण, महागाई, जीएसटीच्या मुद्यावर सरकार चर्चा करण्यास तयार नाही.