शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
3
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
4
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
5
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
6
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
7
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
8
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
9
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
10
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
11
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
12
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
13
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
14
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
15
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
16
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
17
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
18
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
19
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण

एम्ब्रेअर विमानांच्या सौद्याची चौकशी करा

By admin | Published: September 15, 2016 3:03 AM

ब्राझिलची विमान उत्पादक कंपनी एम्ब्रेअरशी भारताने २00८ साली केलेल्या २0.८ कोटी डॉलर्सच्या विमान सौद्यात, लाचखोरी झाल्याचा वाद उद्भवल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी बुधवारी

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीब्राझिलची विमान उत्पादक कंपनी एम्ब्रेअरशी भारताने २00८ साली केलेल्या २0.८ कोटी डॉलर्सच्या विमान सौद्यात, लाचखोरी झाल्याचा वाद उद्भवल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी बुधवारी सीबीआयला सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. एम्ब्रेअर कंपनी व भारत सरकारची संरक्षण संशोधन विकास संघटना (डीआरडीओ) दरम्यान ३ विमानांच्या खरेदीसाठी हा सौदा झाला होता. या वादग्रस्त सौद्यात लाचखोरीचे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने संरक्षण मंत्रालयाला थेट सीबीआय चौकशीचाच निर्णय घ्यावा लागला, असे मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजले.सीबीआय चौकशीचे आदेश जारी होण्यापूर्वी मंगळवारी डीआरडीओचे प्रमुख एस. क्रिस्तोफर यांनी संरक्षण मंत्री पर्रिकरांची भेट घेतली. या भेटीत २0.८ कोटी डॉलर्सच्या विमान सौद्याशी संबंधित सारी माहिती त्यांनी दिली. एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टिमसाठी स्वदेशी रडार युक्त ३ विमाने खरेदी करण्यासाठी एम्ब्रेअर कंपनी व डीआरडीओ दरम्यान २00८ साली करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रसारमाध्यमात या सौद्यातील लाचखोरी संबंधात प्रसृत झालेल्या वृत्ताबाबत डीआरडीओ ने ब्राझिलच्या एम्ब्रेअर कंपनीशी संपर्क साधून अगोदरच स्पष्टीकरण मागवले आहे. युपीए सरकार सत्तेवर असतांना हा करार झाला असल्याने काँग्रेसवर हल्ला चढवण्याची नवी संधी भाजपला मिळाली आहे.सौद्याबाबत बोलतांना सप्ताहाच्या सुरुवातीलाच संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले होते की केवळ प्रक्रियेतल्या विसंगतीपुरते सदर प्रकरण मर्यादित असेल, तर संरक्षण मंत्रालय त्याची अंतर्गत चौकशी करेल. तथापि सदर व्यवहारात गुन्हेगारी स्वरूपाचा कोणताही कोन आढळल्यास चौकशी सीबीआयकडे सोपवली जाईल, कारण संरक्षण मंत्रालय ही चौकशी करू शकत नाही.