शीलेश शर्मा नवी दिल्ली : रुची सोयाच्या बँक कर्जांना एकरकमी परत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियावर (एसबीआय) कोण दबाब आणत होते आणि का? या कारणामुळे बँकेने १८१६ कोटी रुपयांचे कर्ज फक्त ८८३ कोटी रुपये घेऊन प्रकरण मिटवले. या सगळ्या व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
एवढेच नाही तर या कंपनीने १२ हजार १४६ कोटी रुपयांचे कर्ज वेगवेगळ्या बँकांकडून घेतले होते. त्यात पंजाब नॅशनल बँक, एसबीआयचे नाव प्रमुख आहे. एसबीआयकडून घेतलेले कर्ज सर्वात जास्त १,८१६ कोटी रुपये होते. त्यातही अनेक बँका होत्या. सेटलमेंटच्या नावावर स्टेट बँक ऑफ इंडिया फक्त ८८३ कोटी रुपये रुची सोयाकडून परत घेऊ शकली. समोर आलेल्या माहितीनुसार सेटलमेंट होताच रुची सोयाने कंपनी दिवाळखोर जाहीर केली. त्यानंतर बोली लागली. दोन पतंजली आणि वूलमार्क अडानी यांच्या निविदा आल्या. येथेच खेळाची सुरुवात झाली. अडानी समूहाने आपली बोली परत घेतली. परिणामी पतंजलीला रुची सोया विकत घेण्याची संधी मिळाली. पतंजलीने ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज बँकांकडून घेतले. त्यात एसबीआयचाही समावेश होता. काँग्रेसने विचारले की, स्टेट बँकेने रुची सोयाचे कर्ज प्रकरण मिटवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन केले. मालक बदलताच पुन्हा कोट्यवधी रुपयांचे कर्ज कसे दिले?
एसबीआय पैसे देण्यास कशी तयार झाली ?काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून विचारले की, मोदी सरकार बाबावर कृपावंत का आहे? बुडालेली कंपनी विकत घेण्यासाठी (कंपनी बुडाली म्हणून एसबीआयचा पैसाही बुडाला) एसबीआय आणखी पैसा देण्यास कशी तयार झाली? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली? पाहिजे, असे खेडा म्हणाले.