नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात केंद्राने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पीएफआयवर पाच वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता पीएफआय संदर्भात तपास यंत्रणेने मोठा खुलासा केला आहे. इस्लामिक स्टेटचे २२ दहशतवादी पीएफआयच्या संपर्कात असल्याचा खुलासा तपास यंत्रणेने केला आहे. केेंद्रीय तपास यंत्रणेने देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकत पीएफआय संदर्भात डिजिटल माहिती जप्त केली आहे.
तपासात पीएफआयचा निधी पुरवण्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरएसएस नेत्यांची हत्या, दिल्लीत दंगे करण्यात पीएफआयचा सहभाग तसेच यासाठी फंडिंग केल्याचे समोर आले आहे. पीएफआय कोही सोशल मीडिया वापरकर्त्यांना आणि युट्युब चॅनेल यांना फंडिंग पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पीएफआय संघटनेवर ५ वर्षासाठी बंदी का घातली?,वाचा सविस्तर
पीएफआय देशात हिंसक कारवाया करण्यासाठी शिबीर आयोजित करत असल्याची माहिती मिळाली आहे. मागील बुधवारी केंद्र सरकारने पीएफआय आणि त्या संदर्भात ८ संघटनांना पाच वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने रात्री उशीरा अधिसूचना जारी केली होती.
पीएफआयचे काही संस्थापक सदस्य स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे नेते आहेत आणि पीएफआयेचे जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशशी देखील संबंध आहेत. जेएमबी आणि सिमी या दोन्ही प्रतिबंधित संघटना आहेत. 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया'सारख्या दहशतवादी संघटनांशी पीएफआयचे संबंध असल्याची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
Devendra Fadanvis: पीएफआय ही सायलंट किलर, महाराष्ट्रात ६ संघटनांवर बंदी घालणार
सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या इतर अनेकांवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली निर्बंध लादले आहेत.