लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केलेल्या जमिनीच्या व्यवहाराची तसेच त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी हरयाणामध्ये २००५-०६मध्ये रिअल इस्टेट एजंटाकडून तीन भूखंड खरेदी केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचा ईडीने दावा केला.
एका मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा उल्लेख केला आहे.
आरोपपत्रात प्रथमच झाला उल्लेख
यूएईमधील अनिवासी भारतीय उद्योजक सी. सी. थम्पी यांच्या विरोधात ईडीने नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, थम्पी हे रॉबर्ट वाड्रा यांच्याशी तसेच मध्यस्थ संजय भंडारी याचा नातेवाईक सुमित चड्ढा याच्याशी संबंधित आहेत, असा ईडीचा दावा आहे. आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा व प्रियंका गांधी यांचा आरोपी म्हणून उल्लेख नाही. मात्र, एखाद्या प्रकरणात प्रियंका गांधी यांचे नाव प्रथमच आरोपपत्रात नमूद करण्यात आले.