ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - 2017-18 या आर्थिक वर्षात 21 लाख 47 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. संरक्षण विभागासाठी 2 लाख 74 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
सध्याची वित्तीय तूट 3.2 टक्के असून पुढच्या वर्षापर्यंत 3 टक्क्याचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे यावेळी जेटली म्हणालेत.
सरकारला होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच नोटाबंदीमुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याने पुढील वर्षात महसूल तूट कमी होईल, अशी अपेक्षाही जेटलींनी व्यक्त केली आहे.