शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
2
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
3
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
4
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
5
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
6
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
7
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
8
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
9
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
10
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
11
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
12
धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला, म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"; हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली
13
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
14
Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी
15
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या
16
पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह रेट
18
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
19
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
20
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमिताभ, रजनीकांत यांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 5:46 AM

उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा यांचा निमंत्रितांमध्ये समावेश

- त्रियुग नारायण तिवारीलोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : उत्तर प्रदेशमधील अयोध्येत रामजन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिरात २३ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व पूर्वतयारी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव, बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, अरुण गोविल, अभिनेत्री माधुरी दीक्षित, दिग्दर्शक मधुर भांडारकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत आदी मान्यवरांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी सोमवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध परंपरांचे १५० साधुसंत तसेच १३ आखाड्यांचे साधुसंत तसेच सहा दर्शन परंपरांचे शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत तीनहून अधिक ठिकाणी पाहुण्यांची निवासव्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय विविध मठमंदिरांमध्ये व अयोध्येतील रहिवाशांची घरे अशा ठिकाणी मिळून ६०० खोल्या उपलब्ध झाल्या आहेत. तिथेही पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी सांगितले.

अडवाणी, मुरली मनोहर जोशी राहणार अनुपस्थितप्रकृतीच्या कारणापायी व वृध्दापकाळामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी व भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हे भगवान रामाच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहू शकणार नाहीत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना निमंत्रण देण्यासाठी तीन जणांची समिती नेमण्यात आली होती, अशी माहिती चंपतराय यांनी दिली.

२३ जानेवारीपासून भाविकांना दर्शनाची सुविधाट्रस्टचे महासचिव चंपतराय म्हणाले की, भगवान रामाच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १६ जानेवारी रोजी पूजेला प्रारंभ होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर उत्तर भारतातील परंपरेनुसार २४ ते ४८ दिवसांचे मंडल पूजन होईल. २३ जानेवारीपासून या मंदिरात भाविक रामलल्लाचे दर्शन घेऊ शकणार आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर