What Is CERT-in: दोन दिवसांपूर्वी(31 ऑक्टोब) अॅपल iPhone वापरणाऱ्या अनेक नेत्यांना अलर्टचा मेसेज आला होता. यानंतर विरोधकांनी सरकारवर हेरगिरीचे आरोप केले. आता याप्रकरणी सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. केंद्राने अॅपलला नोटीस पाठवली असून, CERT-in या प्रकरणाचा तपास करणार आहे.
काय आहे CERT-in ?तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे CERT-in नेमकं काय आहे? ते काय आणि कोणते काम करते? तर, CERT-in चे म्हणजे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, जी राष्ट्रीय नोडल एजन्सी आहे. ही संस्था संगणक सुरक्षा घटनांना प्रतिसाद देते आणि घटना का आणि कशी घडली, हे स्पष्ट करते. ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत येते.
CERT-in कडे 24/7 ऑपरेशन सेंटर आहे, जे संगणक सुरक्षा घटनांचे अहवाल प्राप्त करुन त्याबाबत आणि विश्लेषण करते. ही संस्था संबंधित घटनेबद्दल सरकारला माहिती देते आणि सायबर सुरक्षा जागरुकता वाढविण्याचे कार्यही करते. आता या संस्थेकडे अॅपल अलर्टच्या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.