नशीब आणि मेहनत या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर तुम्हाला आयुष्यात कुणीच रोखू शकत नाही असं म्हणतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे आयपीएस अधिकारी रवी कुमार सैनी हे आहेत. ज्यांनी एकेकाळी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (KBC) भाग घेऊन आपली वेगळी छाप पाडली होती. बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसून त्यांनी एकेकाळी १५ प्रश्नांची अचूक उत्तरं दिली होती आणि रवी मोहन सैनी हे 'कौन बनेगा करोडपती ज्युनिअर'चे विजेते ठरले होते. आज तोच हुशार मुलगा आयपीएस अधिकारी बनला आहे. मूळचे राजस्थानचे असलेले रवी सैनी यांना गुजरात केडर मिळाले आहे.
रवी सैनी आयपीएस झाल्यामुळे केबीसीच्या आठवणींनाही उजाळा दिला जात आहे. मोठं होऊन IAS किंवा IPS होण्याचं स्वप्नं त्यांनी पाहिलं होतं. स्वतःची मेहनत आणि कुटुंबीयांची साथ यातून सैनी यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण देखील केलं. २००१ सालची गोष्ट आहे जेव्हा रवी सैनी यांनी ज्युनियर केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर छाप पाडली होती. छोट्याशा सैनी यांनी त्यावेळी १५ पैकी १५ प्रश्नांची अचूक उत्तरे देत केबीसी ज्युनिअरचे रवी सैनी करोडपती झाले होते.
वयाच्या १४ वर्षी बनले होते करोडपतीखरंतर रवी सैनी ज्युनियर केबीसीमध्ये करोडपती होणं सर्वांसाठी धक्कादायक ठरले असेलही. पण रवी सैनी हे शालेय शिक्षणापासून अभ्यासात टॉपर होते. त्यामुळे केबीसी ज्युनियरमध्ये करोडपती होण्याच्या मार्गात त्यांना कोणताही अडथळा आला नाही. त्यानंतर आयपीएस अधिकारी होण्यात त्यांना कोणताही अडथळा आला नाही. रवी सैनी हे मूळचे राजस्थानमधील अलवरचे असून आयपीएसमध्ये त्यांना गुजरात केडर मिळाले आहे. केबीसी स्पर्धेत कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण केलं तेव्हा रवी मोहन अवघ्या 14 वर्षांचे होते. त्यामुळे कोट्यधीश झाल्यानंतरही, वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना बक्षिसाची रक्कम कार्यक्रमाच्या नियमानुसार मिळवता आली नव्हती.
रवी सैनी यांना मिळालेले ६९ लाख2014 बॅचचे आयपीएस अधिकारी रवी मोहन सैनी हे देखील डॉक्टरही आहेत. ते गुजरातमधील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरचे एसपीही राहिले आहेत. ते गुजरातमधील राजकोट शहरातील झोन क्रमांक 1 मध्ये डीसीपी आणि त्यापूर्वी सुरत शहरातील जी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) म्हणूनही नियुक्त झाले आहेत. KBC कडून मिळालेल्या ६९ लाखांच्या बक्षिसाच्या रकमेतून त्यांच्या कुटुंबीयांनी कार खरेदी केली होती. रवी सैनी यांना ही गोष्ट कधीच विसरायची नाही. त्या रकमेतून काही जमीन खरेदी करण्यात आली, तर काही रक्कम शिक्षणासाठी खर्च करण्यात आली. उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा ठेवली होती.