'ती' मोठ्याने हसली अन् प्रेमात फसली; इराणी मुलीने केलं भारतीयाशी लग्न, 'अशी' होती लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:44 PM2023-02-13T14:44:38+5:302023-02-13T14:45:52+5:30

विष्णू मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये जेवत होता. तेवढ्यात त्याला एका मुलीचा जोरजोरात हसण्याचा आवाज आला.

iranian girl fell in love with kerala boy unique love story marriage proposal | 'ती' मोठ्याने हसली अन् प्रेमात फसली; इराणी मुलीने केलं भारतीयाशी लग्न, 'अशी' होती लव्हस्टोरी

फोटो - आजतक

googlenewsNext

इराणमधील एक मुलगी नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. येथे तिची केरळमधील एका मुलाशी भेट झाली. दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे त्याचे लग्न झाले. या दोघांची लव्हस्टोरी आता व्हायरल झाली आहे. हेंगामेह असं या मुलीचं नाव आहे. तर, मुलाचे नाव विष्णू आहे. दोघे 2017 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. हेंगमेह फार्मसी शिकण्यासाठी भारतात आली. विष्णू आणि हेंगमेह एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. याच दरम्यान त्यांची भेट झाली. दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्सा खूपच मजेशीर आहे.

विष्णू त्याच्या मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये जेवत होता. तेवढ्यात त्याला एका मुलीचा जोरजोरात हसण्याचा आवाज आला. ती तिच्या काही मैत्रिणींसोबत जेवत होती आणि सतत हसत होती. विष्णुला सुरुवातीला वाटलं की ती त्याच्याकडेच बघून हसत आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी देखील त्याला ती त्याच्याकडेच पाहत असल्याच सांगितलं. काही वेळाने विष्णूने मुलीला तिचे नाव विचारले. तेव्हा तिचे नाव हेंगामेह असून ती इराणची असल्याचं समजलं.

तुम्ही परदेशातून आहात, इथे काही अडचण किंवा गरज असेल तर तुम्ही मला फोन करू शकता असं विष्णूने मुलीला सांगितलं, अशा प्रकारे त्यांनी एकमेकांचा नंबर घेतला. यानंतर ते रोज कॅन्टीनमध्ये भेटू लागले. विष्णू आणि हेंगामेह यांच्यात अनेक महिने चर्चा सुरू होती. ते एकत्र फिरले, जेवले, पार्टी केली. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागले. एके दिवशी हेंगामेहने सांगितले की, तिला एका महिन्यासाठी तिच्या देशात इराणला जावे लागेल. हे ऐकून विष्णू भावूक झाला. हेंगामेह एक महिन्यानंतर परत आली तेव्हा विष्णूने तिला आपल्या मनातील भावना सांगितल्या. 

विष्णूला त्याच्या लाजाळू स्वभावामुळे प्रपोज करता येत नव्हते. त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. वेगळ्या संस्कृतीच्या, वेगळ्या देशाच्या, वेगळ्या भाषेच्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. मात्र या दोघांना कुटुंबीयांनी साथ दिली. कुटुंब आमच्यासोबत राहिले. लोकांनी आम्हाला टोमणे मारले, पण तरीही आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही आणि आज लग्नानंतर आम्ही एकत्र आयुष्य आनंदाने एन्जॉय करत आहोत असं हेंगामेहने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: iranian girl fell in love with kerala boy unique love story marriage proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.