नवी दिल्ली - कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशनने (आयआरसीटीसी) 22 मार्चपासून खाण्यासंदर्भातील सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आला रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना चहा, नाश्ता आणि भोजनही मिळणार नाही. रेल्वेस्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट, सेल किचन आणि जन आहारदेखील बंद करण्यात येणार आहे.
आयआरसीटीसीचे ग्रुप महाव्यवस्थापक आशीष भाटिया यांनी यासंदर्भात 20 मार्चला सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून सूचना केली आहे. यानुसार जोवर पूढील आदेश येत नाही, तोवर मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमधील पेंट्रीकार आणि साइड वेंडिंग व्यवस्था बंद राहतील.
मुख्य क्षेत्रीय महाव्यवस्थापक अश्विनी श्रीवास्तव यांनी सांगितले, की मिळालेल्या सूचनांचे 22 मार्चपासून कठोरपणे पालन केले जाईल. यासंदर्भात सर्व रेल्वेस्थानकांना आदेश देण्यात आलेले आहेत.
यानिर्णयानंतर रेल्वेगाड्यांत पेंट्रीकार आणि साइड वेंडिंग बंद केल्यानंतर लवकरच रेल्वेस्थानकांवरील उपहारगृहेही बंद केली जाऊ शकतात, यासंदर्भात वरिष्ठ अधिकांऱ्यांतही विचार सुरू आहे.
३७०० रेल्वेगाड्या रद्द -रेल्वेने केलेल्या घोषणेनुसार, रविवारी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये २४०० पॅसेंजर तर, १३०० लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे ४ ते रात्री १० या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. रेल्वेच्या सर्व विभागांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत रविवारी लोकलचे वेगळे वेळापत्रक असते. तसेच मेगाब्लॉकच्या काळात काही सेवा रद्द केल्या जातात. त्यानंतरही अनेक लोकल रद्द करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या किती फेऱ्या रद्द होतील, याची माहिती शनिवारी जाहीर केली जाईल.
परप्रांतीय माघारीखासगी कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देताच वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरुवात केली. चाकरमानीही गावाकडे निघाले. त्यामुळे गेले चार दिवस कमी गर्दी असलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठी रांगा लागल्याचे दिसून आले.