नवी दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनांने पालन करत भारतीय रेल्वेने विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेकडून गाड्यांच्या रिक्त जागांची यादी जारी केली आहे. तसेच, यावेळी काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदलही करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम मध्य रेल्वेने काही विशेष गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.
अहमदाबाद ते गोरखपूर, अहमदाबाद ते मुझफ्फरपूर आणि मुंबई सेंट्रल ते अमृतसर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हा बदल 01 जुलै 2020 पासून लागू करण्यात येणार आहे. पश्चिम मध्य रेल्वेकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.
अहमदाबाद ते गोरखपूर दरम्यान धावणारी विशेष ट्रेन नं. 09089/09090, अहमदाबाद ते मुझफ्फरपूर दरम्यान धावणारी विशेष ट्रेन नं. 09083/09084 आणि मुंबई सेंट्रल ते अमृतसर दरम्यान धावणारी विशेष ट्रेन. नं. 02903/02904 च्या स्थानकांवर थांबण्याच्या वेळेत बदल केला आहे.
भारतीय रेल्वेने दरभंगा एक्स्प्रेस, जन शताब्दी एक्स्प्रेस, बिहार संपर्क क्रांती, संपर्क क्रांती, अवध एक्स्प्रेस, लखनऊ मेल, भोपाळ मेल, गोमती एक्स्प्रेस, पूर्वा एक्स्प्रेस आणि दुरंतो यांसह सर्व विशेष गाड्यांमध्ये रिक्त जागांची यादी जारी केली आहे. प्रवासी त्यांच्या प्रवासानुसार ट्रेनमध्ये रिक्त असलेल्या जागांच्या आधारावर तिकीट बुक करू शकतात.
सध्या सुरू असलेल्या 230 विशेष रेल्वे गाड्या वेळेवर धावल्या पाहिजेत सर्व झोनला भारतीय रेल्वेने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. या रेल्वेगाड्या चालवताना 100 टक्के वेळेवर निर्बंध घालण्याचे आदेश रेल्वेने दिले होते. तसेच, रेल्वेच्या विभागीय प्रमुखांना याकडे लक्ष लक्ष देण्यास सांगितले होते.
सर्व झोनला रेल्वेने पाठवलेल्या संदेशात असे म्हटले आहे की, सध्या फारच कमी गाड्या धावत आहेत, त्यामुळे उशीर होऊ नये. रेल्वेचे सात झोन आहेत, ज्यासाठी असे म्हटले आहे. यात पूर्व कोस्ट रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, पूर्व मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वे विभागाच समावेश आहे.