मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉपोर्रेशन( आयआरसीटी)चा शेअर बाजारात जोरदार प्रवेश झाला असून, आयआरसीटीच्या शेअर्सचे बीएसईवर सुमारे दुप्पट किमतीत म्हणजेच ६४४ रुपयांना लिस्टिंग झाले. काही वेळातच त्यांचे मूल्य ६९१ रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे आयआरसीटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे अवघ्या काही दिवसांतच दुप्पट झाले आहेत.
आयआरसीटीच्या आयपीओला ज्याप्रकारचा प्रतिसाद मिळाला होता, ते पाहता शेअर बाजारातही त्याची चलती असले, अशी अपेक्षा होती. आयपीओ ला ११२ टक्के प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आयआरसीटीसीच्या शेअरचे सोमवारी दुप्पट किमतीत लिस्टिंग झाल्यावरही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
आयआरसीटीच्या शेअरचा प्राइस बँड (प्राथमिक किंमत) ३१५ ते ३२० रुपये होता. कंपनीच्या आयपीओसाठीच्या अर्जाची ३0 सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर होती. आयपीओद्वारे आयआरसीटीसीने ६४५ कोटी रुपये जमवण्याचे निश्चित केले होते. प्रत्यक्षात त्यांना शेअर्ससाठी गरजेपेक्षा ११२ पट अधिक किंमत मिळाली. त्याचे बाजारमूल्य ११ हजार कोटींच्या पुढे पोहोचले. त्यामुळे सेन्सेक्सबरोबरच एनएसईवरही या शेअर्सची लिस्टिंग ६२६ रुपयांना झाली होता.