नवी दिल्लीः रेल्वे तिकीट बुक करण्याच्या वेळेत काही स्टेशनांवर बदल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बदललेल्या वेळेनंतर 7 मेपासून 19 स्टेशनांवरच्या तिकीट काऊंटरवर 11ऐवजी 11.30 वाजता तिकीट मिळणार आहे. रेल्वेनं हा बदल रेल्वे प्रवाशांना दलालांपासून वाचवण्यासाठी केला आहे. उत्तर रेल्वेच्या लखनऊ मंडळाच्या 19 स्टेशनांवर तात्काळसह अनारक्षित तिकीट सेवा प्रणालीच्या वेळेत बदल केला आहे.छोट्या छोट्या स्टेशनांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे तिथे दलालांचा अड्डा तयार झाला आहे. तिकीट काढण्यासाठी खूपच गर्दी असल्यानं बऱ्याचदा यात्री एकमेकांबरोबर वाद घालतात.
- का घेतला हा निर्णयः उत्तर रेल्वेनं तीन मे रोजी मंडळ कार्यालयातील सर्वच स्टेशनांवर नोटीस जारी केलं होतं. निवडणुकीमुळे स्टेशनांवरच्या सुरक्षेचा बंदोबस्ता काहीसा कमकुवत आहे. तिकीट काढण्यासाठी बऱ्याचदा यात्री एकमेकांशी वाद घालतात. तो वाद टाळण्यासाठीच रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.
- या स्टेशनांवर बदलली तिकीट बुक करण्याची वेळ- या स्टेशनांमध्ये कानपूर ब्रिज, कुंडा हरनामगंज, फुलपूर, लंभुआ, मुसाफिर खाना, जौनपूर सिटी, सेवापुरी, बादशाहपूर, शिवपूर, मरियाहू, खेता सराय, जलालगंज, आचार्य नारायण देव नगर, जाफराबाद, मालिपूर, गोसाईगंज, अंतू, बाबतपूर आणि श्रीकृष्णानगरचा समावेश आहे.