शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

तेजस एक्स्प्रेस 17 ऑक्टोबरपासून धावणार; उद्यापासून बुकिंग सुरू, नवीन नियमांबद्दल जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 1:31 PM

IRCTC Tejas Train restart : तेजस एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

ठळक मुद्देमंगळवारी आयआरसीटीसी आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस पुन्हा रुळावर धावणार आहे. आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ही माहिती दिली आहे. 

दरम्यान, तेजस एक्स्प्रेसच्या नावाने दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान खासगी ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना व्हायरसमुळे 22 मार्चपासून या ट्रेनचे परिचालन थांबविण्यात आले. पण, आता 17 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत. आयआरसीटीसीमार्फत या ट्रेन चालविण्यात येतात.

उद्यापासून ट्रेनचे बुकिंगतेजस एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. आयआरसीटीसीकडून (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) या ट्रेनच्या सीटचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. तसेच, प्रवासादरम्यान प्रवाशांना ट्रेनमध्ये पॅक करुन जेवण मिळणार आहे. मंगळवारी आयआरसीटीसी आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

'या' मार्गांवर ट्रेन धावणारदेशाची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस लखनऊ ते दिल्ली मार्गावर सुरु झाली. त्यानंतर अहमदाबाद-मुंबई मार्गावर दुसरी खासगी ट्रेन सुरू झाली. तिसरी खासगी ट्रेन वाराणसीहून इंदूरला गेली. कॉर्पोरेट क्षेत्रातील देशातील पहिली ट्रेन तेजस सुमारे एक वर्षापूर्वी लखनऊ ते दिल्ली मार्गावर सुरु झाली होती. आधुनिक सुविधांसहित ही ट्रेन प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय झाली. उशीर झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याचा नियम असलेली देशातील ही पहिली ट्रेन आहे.

तेजस एक्सप्रेस आपल्या खास प्रवासी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. या ट्रेनमध्ये उत्कृष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि ड्रिंक विनामूल्य आहेत. तसेच, ट्रेनला उशिरा झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाते. एका तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 100 रुपये आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्या 250 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. 

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेसrailwayरेल्वेIRCTCआयआरसीटीसीcorona virusकोरोना वायरस बातम्या