सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करावा यासाठी १६ वर्षांहून अधिक काळ झगडणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी पीपल रिसर्जन्स अॅण्ड जस्टीस पार्टी (पीआरजेए) स्थापन करून राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली होती. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या विरोधात त्या थॉबोल मतदारसंघातून उभ्या होत्या. परंतु त्यांना अवघी ९० मते मिळाली. १५ हजार मतांनी इबोबी विजयी झाले. जनतेने दिलेला कौल मान्य करीत इरोम शर्मिला यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या मतदारसंघात नोटाला यापेक्षा अधिक मते (१४३) मिळालीआपण राजकारण सोडणार आहोत. तथापि, राज्यातील अफस्पा कायद्याविरुद्धचा आपला संघर्ष सुरूच राहील. मी या राजकीय प्रणालीला वैतागले आहे. मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मला मन:शांती हवी असल्यामुळे मी दक्षिण भारतात जाणार आहे.- इरोम शर्मिला
इरोम शर्मिला यांना केवळ नव्वद मते; नोटापेक्षाही कमी
By admin | Published: March 12, 2017 12:52 AM