लखनऊ - उत्तर प्रदेशमधील ओरिया जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत आयोजित विवाह सोहळ्यात नववधूंना चांदीच्या जागी लोखंडाची पैंजण आणि जोडवी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या फसवण्यात आल्याची तक्रार काही नववधूंनी जिल्हाधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्याकडे केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. जिल्हाधिका-यांनी 18 फेब्रुवारीला पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात वाटप करण्यात आलेल्या दागिन्यांप्रकरणी तपास समिती गठीत केली आहे. समाज कल्याण अधिकारी विनीत तिवारी यांना समितीचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. जिल्हाधिका-यांनी दागिन्यांचं वाटप करण्याची जबाबदारी असणा-या कंपनीचं काम सध्या थांबवलं आहे.
रचना कुमारी, सरबीन, पिंकी, सत्यवती, यासमीन बानो, नीरज आमि कुसुमलता या नववधूंनी जिल्हाधिका-यांकडे लोखंडाचे दागिने मिळाल्याची तक्रार केली. योजनेच्या नावाखाली आपली फसवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यामुळे आपल्याला प्रचंड दुख: झाल्याच प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत राज्यभरात सामूहिक विवाह सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत असून गरिब, विधवा आणि निराधार महिलांचा पुनर्विवाह केला जात आहे. यावेळी त्यांना आवश्यक आणि गरजेच्या वस्तू म्हणजे भांडी वैगेर भेट म्हणून राज्य सरकारकडून दिले जाते. विवाहित जोडप्याला सरकारकडून मदत म्हणून 20 हजार रुपयांचा चेकही दिला जातो.
याशिवाय 10 हजार रुपयांच्या वस्तू भेट म्हणून मुलीला दिल्या जात्यात. सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्येक जोडप्यासाठी पाच हजार रुपये खर्च होतात. यावेळी जेणवाचाही भव्य व्यवस्था केलेली असते. मात्र यासाठी काही मर्यादा आहे. ज्याच्या आधारे वर आणि वधू पक्षातील लोकांना आमंत्रण दिलं जातं.