जळगावात पोलीस स्टेशनसमोर दगडफेक तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला : ६० जणांवर दंगलीचा गुन्हा; २० जण ताब्यात
By admin | Published: February 22, 2016 2:15 AM
जळगाव: जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन रणजित अनिल चव्हाण (रा.गुरुनानक नगर) या तरुणावर हल्ला केल्याने शनी पेठमध्ये रविवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आला. यात पोलीस स्टेशनच्या समोरच दोन गटांनी एकमेकावर तुंबळ दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी संशयावरुन २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या परिसरात तणाव कायम होता.
जळगाव: जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन रणजित अनिल चव्हाण (रा.गुरुनानक नगर) या तरुणावर हल्ला केल्याने शनी पेठमध्ये रविवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आला. यात पोलीस स्टेशनच्या समोरच दोन गटांनी एकमेकावर तुंबळ दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी संशयावरुन २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या परिसरात तणाव कायम होता.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री साडे आठ वाजता रणजित चव्हाण हा तरुण शनी पेठ पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर मित्रांसोबत उभा असताना तेथे दहा ते बारा जणांनी येवून त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात जबर मार लागल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याचा रुग्णालयात जबाब घेवून गुन्हा दाखल करण्याची पक्रिया सुरु करताच दोन्ही कडील लोक पोलीस स्टेशनला जमले व बाहेर शिवीगाळ करायला सुरुवात केली.लाईट फोडून केला दगडाचा मारा रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी जमा झाल्यानंतर त्यातील काही जणांनी हल्ला करण्याच्या उद्देशाने परिसरातील विद्युत खांबावर दगड मारुन दिवे फोडले. पोलीस स्टेशनलाच लागून असलेल्या विद्युत डी.पी.वरही दगडफेक करुन वीज पुरवठा बंद करण्यात आला.त्यानंतर दगड व विटांचा मारा सुरु झाला. यात काचेच्या बाटल्या तसेच ट्युब लाईटचा वापर करण्यात आला. याप्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. धरपकडदोन्ही बाजूंनी दीडशे ते दोनशे जणांचा जमाव एकमेकावर हल्ला करत असल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व नियंत्रण कक्षातून तातडीने जास्तीचा बंदोबस्त मागवून घेतला. यावेळी हल्लेखोरांना घरातून काढून ताब्यात घेण्याचे आदेश ठाकूर यांनी दिल्याने पोलिसांनी धरपकड सुरु केली. यात रात्री उशिरापर्यंत वीस जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यांना घेतले ताब्यात संशयावरुन हेमंत गोयल, लखन, अल्फाईज, अमिन, आकाश,अनीस शेख, जाकीर, मोहम्मद खाटीक व आसीफ शहा यांच्यासह २० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. नंदकुमार ठाकूर हे स्वत: रात्री त्यांची उशिरापर्यंत चौकशी करत होते.