पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला मृतदेह, शेजारी फुलं...; जीएसटी अधिकाऱ्याने आई बहिणीसह स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:06 IST2025-02-22T13:03:11+5:302025-02-22T13:06:18+5:30

केरळमध्ये अधिकारी असलेल्या भाऊ बहिणीने आईसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

IRS officer and mother sister die tragic mysterious death in Kerala | पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला मृतदेह, शेजारी फुलं...; जीएसटी अधिकाऱ्याने आई बहिणीसह स्वतःला संपवलं

पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला मृतदेह, शेजारी फुलं...; जीएसटी अधिकाऱ्याने आई बहिणीसह स्वतःला संपवलं

Kerala Crime:केरळच्या कक्कनडमध्ये सेंट्रल एक्साईज स्टाफ क्वार्टरमध्ये आयआरएस अधिकारी आणि त्यांची आई आणि बहिणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. हे कुटुंब झारखंडचे रहिवासी होते. पोलिसांना घरात हिंदीत लिहिलेली एक सुसाईड नोटही सापडली. गुरुवारी तिघांनीही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अधिकाऱ्याच्या इतर कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये मृत्यूनंतर परदेशात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला याबाबत सांगण्याची विनंती करण्यात आली आहे.

आयआरएस अधिकारी मनीष विजय अग्रवाल आणि त्यांची आई आणि बहीण यांचे मृतदेह कोचीजवळील कक्कनड येथील सेंट्रल एक्साइज स्टाफ क्वार्टरमध्ये सापडले आहेत. मनीष विजय अग्रवाल यांची बहीण शालिनी विजय या झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये टॉपर होत्या. तर मनीष विजय केरळमधील कक्कनड येथे सीमाशुल्क विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. शालिनी या झारखंडमध्ये डेप्युटी कलेक्टर पदावर कार्यरत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्या रजेवर गेल्या होत्या. त्यानंतर त्या ड्युटीवर परतल्या नाहीत. मात्र आता त्यांच्यासह भावाची आणि  आईच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

दुसरीकडे, मनीष विजय हे आठवडाभराच्या रजेवर होते. आठवडाभरानंतर ते कामावर परतणार होते. मात्र ते तिथे गेले नाहीत. त्यांना फोन देखील बंद येत होता. त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या घराला आतून कुलूप होते. अनेकवेळा बेल वाजवून दार ठोठावूनही कोणीच दार उघडले नाही. त्यामुळे काहीतरी घडलं असल्याची शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

केरळ पोलिसांना घरात मनीष आणि त्यांच्या बहिणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.  तर आई शकुंतला यांचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. मनीष विजय यांच्या आईचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला फुले ठेवली होती. मनीष आणि शालिनी यांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळले. आईचा मृत्यू आधी झाला असावा किंवा तिची हत्या केल्यानंतर भाऊ व बहिणीने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि शालिनी दोघेही अविवाहित होते. पोलिसांना घरातून हिंदीत लिहिलेली सुसाईड नोट सापडली, ज्यात परदेशात असलेल्या त्यांच्या बहिणीला या घटनेची माहिती द्यावी, अशी विनंती केली होती. गेल्या दीड वर्षांपासून अग्रवाल कुटुंब या क्वार्टरमध्ये राहत होते. शेजाऱ्यांशी त्यांचा जास्त संबंध नव्हता. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कधी कधीच मनीष यांची आई बाहेर दिसत होती. 

Web Title: IRS officer and mother sister die tragic mysterious death in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.