शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

ट्रिपल तलाकविरोधात लढा देणा-या इशरत जहाँ यांचा भाजपाप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 8:43 AM

ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल करणा-यांपैकी एक असलेल्या इशरत जहाँ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली - ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल करणा-यांपैकी एक असलेल्या इशरत जहाँ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ट्रिपल तलाक ही प्रथा बेकायदेशीर आणि मुस्लिम महिलांसाठी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची गळचेपी असल्याचे सांगत पश्चिम बंगालमधील हावडा येथील इशरत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 'एनडी टीव्ही'च्यावृत्तानुसार, इशरत जहाँ हावडा येथील कार्यालयात येऊन भाजपामध्ये सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे पश्चिम बंगालमधील सरचिटणीस सायंतन बस यांनी दिली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या हावडा येथील शाखेने शनिवारी इशरत जहाँ यांना सन्मानित करुन पक्षात प्रवेश दिला. बसू पुढे असेही म्हणाले की, इशरत यांचा सन्मान करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

कोण आहेत इशरत जहाँ?तिहेरी तलाक विरोधात कोर्टात जाणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालच्या हावडामधील इशरत जहाँ यांचाही समावेश आहे. इशरत यांच्या पतीने दुबईतून फोनवरून त्यांना तलाक दिला होता. इशरत जहाँ यांना लग्नानंतर 15 वर्षांनी पतीने तिहेरी तलाक दिला. त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं, 2001 मध्ये त्यांचं लग्न झालं असून त्यांना मुलं आहेत. त्या मुलांना त्यांच्या पतीने जबरदस्तीने त्यांच्याकडे ठेवलं आहे. आपली मुलं परत मिळावी तसंच पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी इशरत यांनी याचिकेत केली. तिहेरी तलाक बेकायदेशीर असून मुस्लिम महिलांच्या अधिकाराची गळचेपी असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं.

तिहेरी तलाक विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच प्रमुख महिलांमध्ये इशरत जहाँ यांच्यासह शायरा बानो, आफरीन रहमान, अतिया साबरी, गुलशन परवीन यांचा समावेश आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी