शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

इशरत; कारवाई रद्द करण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

By admin | Published: March 02, 2016 2:36 AM

२००४ मधील इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्ध करण्यात आलेली फौजदारी कार्यवाही, निलंबन आणि अन्य कारवाई रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : २००४ मधील इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्ध करण्यात आलेली फौजदारी कार्यवाही, निलंबन आणि अन्य कारवाई रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याने नुकत्याच दिलेल्या कबुलीजबाबाच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची सदस्य होती, असे हेडलीने मुंबई न्यायालयाला सांगितले होते. ‘ही याचिका सुनावणीसाठी दाखल करण्यात येत आहे,’ असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि न्या. यू. यू. ललित यांच्या पीठाने म्हटले आहे. या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्याची विनंती वकील शर्मा यांनी केली होती. इशरत जहाँला एका चकमकीत ठार मारण्यात आले होते. याप्रकरणी तत्कालीन डीआयजी डी.जी. वंजारासह गुजरातच्या काही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईच्या न्यायालयात खटला सुरू आहे.(वृत्तसंस्था)