दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आता पाकिस्तानच्या सहाय्याने आणखी एका दहशतवादी कारस्थानाचा खुलासा झाला आहे. खरे तर, दहशतवादी 'मेड इन चायना' शस्त्रांद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. जम्मूमध्ये टनेल आणि स्नायपर हल्ल्यांत चिनी साधनांचा वापर करण्यात येत आहे. तर काश्मीरमध्ये आयईडी आणि ड्रोन ही नवीन पाकिस्तानी शस्त्रे आहेत.
पाकिस्ताननी गुप्तचर संस्था आयएसआय, भारताविरुद्ध हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना चिनी बनावटीची विशेष उपकरणे पुरवत आहे. या दहशतवाद्यांना आयएसआयकडून ग्रेनेड, पिस्तूल, नाईट व्हिजन डिव्हाईस, ड्रोन आणि डिजिटल सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टिम सारख्या चिनी बनावटीच्या साधनांचा पुरवठा करत आहे. पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवादी छावण्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. यात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, स्फोटक सामग्री पुरविणे आणि त्यांच्यासाठी जंगल युद्ध मोड्यूल तयार केले जाते.
दहशतवाद्यांना चिनी शस्त्रे पुरवत आहे आयएसआय -आयएसआयच्या पाकिस्तान-काश्मीर-चीन अशा ट्रॅंगल योजनेनुसार, दहशतवाद्यांच्या गरजेप्रमाणे चीनमध्ये शस्त्रे तयार करून, ती पाकिस्तानला पाठविली जातात. यानंतर, ती शस्त्रे काश्मीरमध्ये पोहोचतात. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना पिस्तूल, ग्रेनेड आणि नाईट व्हिजन सारख्या चिनी उपकरणांचा पुरवठा होतो. याशिवाय चिनी ड्रोनच्या माध्यमाने भारतीय भागात दहशतवाद्यांना मदत करण्यासाठीही शस्त्रास्त्रे पाठविली जातात. दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यासाठी विशेष डिजिटल मॅप शीट देण्यात येते. याद्वारे नेव्हिगेशन सिस्टीमच्या सहाय्याने घुसखोरी करण्याचा कट रचला जात आहे.