ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि - लीबियातून चार भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली असून या घटनेमागे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया ( आयसिस) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
त्रिपोलीजवळी सर्ते शहरातून गुरूवारी संध्याकाळी या भारतीयांचे अपहरण करण्यात आले असून अद्याप दहशतवाद्यांकडून कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही.
अपहरण झालेल्यांपैकी दोन जण हैदराबादचे तर दोघे कर्नाटकमधील असून तीन जण सर्ते येथील विद्यापीठात शिक्षक असून एक नागरिक विद्यापीठात नोकरीला आहे. अपहरण झासेल्या चार भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांशी आम्ही संपर्कात आहोत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालायचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.