नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) बुधवारी ISIS या दहशतवादी संघटनेचा मोठा कट उधळला आहे. NIAनं नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील एकूण 16 ठिकाणांवर छापेमारी करत ISISच्या नवीन मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. NIAच्या छापेमारीदरम्यान आयसिसचे नवे मॉड्युल Harkat-ul-Harb-e-Islam चा खुलासा करण्यात आला आहे. हे नवीन मॉड्युल पूर्णतः ISIS वर आधारित होते आणि उत्तर प्रदेश- नवी दिल्लीतील काही भागांमध्ये सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे. NIA , दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश एटीएस यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईदरम्यान बुधवारी एकूण 16 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून 5 संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले.
उत्तर प्रदेशातील अमरोहा, दिल्लीतील जाफराबाद येथील ठिकाणांवर NIAकडून छापा मारण्यात आला. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून शस्त्रास्त्र आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
(वेशांतर करून वावरतोय दहशतवादी; फोटो जारी)
('आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक')
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून दहशतवादी कृत्य घडवण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.