नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या युद्धासाठी इस्लामिक स्टेटने (आयएस) जिहादींच्या संघटनांचा विस्तार करण्याची प्रतिज्ञाच केली आहे. जगाची वाईट शक्तीतून सुटका करून न्याय स्थापन होण्यासाठी मार्ग तयार करणारा महदी किंवा मुक्तिदाता परत येईल अशा धार्मिक भाकितांचा आधार यासाठी घेण्यात येत आहे. मंगळवारी जिहादींसाठीच्या व्यासपीठावर ही धमकी इस्लामिक स्टेटने आॅनलाईन प्रसिद्ध केली आहे. इस्लामिक स्टेट आता इराक आणि सिरियाच्या पलीकडे विस्तारणार आहे, असे आयएसच्या ब्लॅक फ्लॅग्ज् नावाच्या जाहीरनाम्यात म्हटले. ‘‘आता त्याचा विस्तार भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानात (आणि इतर अनेक देशांत) होईल.’’ आयएसचे धोरण हे हल्ला करा आणि पळून जा आणि लपून राहा या धोरणाचे आहे. त्यामुळे अब्जावधी युरो, लक्षावधी पोलीस, चौकशी त्यातून प्रमुख शहरे बंद पडणार आणि पर्यायाने पैशांचे नुकसान होणार, असे आयएसच्या या धोरणाची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या पुस्तकात म्हटले आहे.पुस्तकाने म्हटले आहे की नुकतेच बेल्जियम बंद पाडले गेले होते त्यामुळे रोज ५३ दशलक्ष युरोचे नुकसान झाले ते कशासाठी तर काही हजार डॉलर किमतीच्या एके-४७ रायफल बाळगणाऱ्या अवघ्या २० जणांच्या शोधासाठी.युरोपमध्ये मुस्लिमांना हाती शस्त्र घ्यायला लागणे भाग पडत आहे त्यामुळे भविष्यातील हल्ले हे पाश्चिमात्य देशांत मुस्लिम स्वसंरक्षणासाठी गट तयार करून करतील. त्यानंतर इराकमध्ये जसा जिहाद सुरू झाला तसा तो युरोपमध्ये सुरू होईल व हे पुस्तक त्यासाठी मार्गदर्शन करील,’’ असे त्यात म्हटले आहे.आयएसमध्ये भरती करण्यासाठी इलेक्ट्रानिक माध्यमांचा वापर केला जात नाही. पॅरीसमधील हत्याकांडाचा सूत्रधार अब्देलहामिद अबाऊदने ज्यांनी हा कट अमलात आणला त्यांच्याशी संपर्कासाठी फोन किंवा ई मेलचा वापर केला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोदी उजव्या विचारसरणीचे भारतात हिंदूंची चळवळ वाढतेयइस्लामिक स्टेटच्या या पहिल्याच प्रकाशनात आयएसने भारतातील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. विश्लेषणात म्हटले आहे की हिंदूंची चळवळ वाढत असून गायीचे मांस खाणाऱ्या मुस्लिमांना ती ठार मारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उजव्या विचारसरणीचे राष्ट्रवादी नेते असून ते मुस्लिमांविरुद्धच्या भविष्यातील युद्धासाठी शस्त्रांची पूजा करतात.भविष्यातील इस्लामिक स्टेटच्या लढाया या जगात दीड अब्ज मुस्लिम असल्यामुळे प्रत्येक देशात होतील. हे मुस्लिम प्रत्येक देशात आणि प्रत्येक ठिकाणी हे युद्ध लढतील. या युद्धाचे भयंकर स्वरूप हे अल दज्जल (ख्रिश्चनांविरुद्ध) असेल.
इसिसचा भारताला धोका
By admin | Published: December 03, 2015 3:19 AM